
बीड प्रतिनिधी : शहरातील स्वराज्यनगर भागातील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये ग्राहकाचे एटीएम कार्ड बदलून अज्ञाताने ३६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
बीड शहरातील स्वराज्य नगर परिसरातील एसबीआयच्या एटीएममधून शनिवार (दि.४) दुपारी ३ च्या सुमारास मोमिन नवीद कैसर अब्दुल सईद (वय ४०) रा. मोमीनपुरा हे स्वराज्य नगर भागातल्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आले. आपल्या खात्यातून त्यांनी पैसे काढले आणि दवाखान्यात गेले.
मात्र तेवढ्या वेळात त्यांच्या खात्यातून ३६ हजार रुपयेे काढले जात असल्याचे मॅसेज आले. आरोपीने मोमीन नवीद कैसर हे जेव्हा एटीएममध्ये होते तेव्हा त्यांचा चोरून पीन पाहिला ज्यावेळी मोमीन यांचे कार्ड मशीनमध्ये होते. त्या वेळी आरोपीने कार्डची अदलाबदल करत मोमीन यांना स्वत:जवळील बनावट कार्ड दिले . त्याच वेळी मोमीन यांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी मोमीन यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसत ठाण्यात बुधवार (दि.८)रोजी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.