बीड प्रतिनिधी :शहरातील सर्वात वर्दळीचे ठिकाण असलेल्या बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूस एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरु आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बीड बस स्थानक परिसराच्या पाठीमागील बाजूस गांधी नगर भागातील नौशाद नावाच्या तरुणाचा मृतदेह सकाळी आढळून आला. पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृत्यूचे खरे कारण आणखी समोर आले नाही. परिसरात सदर तरुणाचा खून करण्यात आल्याच्या चर्चा असून शिवाजीनगर पोलीस मात्र या घटनेचा तपास करीत आहे.
