ब्रेकिंग न्यूज

आजच्या राजकारणात स्वतःलाच महामानव समजणाऱ्यानां शिक्षा झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही : माजी सभापती ज्ञानोबा कांबळे,,,,!

आंबेजोगाई (प्रतिनिधी)

जोगाईवाडीच्या ग्रामपंचायत कार्यालयात नंदकिशोर मुंदडा व स्वर्गीय विमलताई मुंदडा यांचे फोटो, महामानवांच्या शेजारी व बरोबरीने नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा यांच्याच संमतीनेच लागली असून, सरपंच व उपसरपंच सह नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा यांच्यावर महामानवांचा अनादर अपमान केल्याबद्दल ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार ताबडतोब कार्यवाही करावी,अशा आशयाची फिर्याद माजी सभापती ज्ञानोबा कांबळे यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली असून, ताबडतोब कार्यवाही नाही झाल्यास सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची तयारी ज्ञानोबा कांबळे यांनी दर्शवली आहे.
या संदर्भात पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत ज्ञानोबा कांबळे यांनी असे म्हटले आहे की, जोगाईवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड येथे सरपंच मनिषा बालासाहेब दोडतले‌ आहेत तर उपसरपंच सुनिल बाबूराव मस्के आहेत. त्या दोघांच्या पक्षांचे नेते अक्षय नंदकिशोर मुंदडा आणि नंदकिशोर शिवभगत मुंदडा हे दोघे आहेत.‌ वरिल चौघांनी संगनमत करून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचा अनादर करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय जोगाईवाडी येथील शासकीय कार्यालयात विमल मुंदडा यांचा फोटो वरिल तिन्ही महापुरुषांच्या बरोबरीने लावलेला आहे. त्यासोबतच नंदकिशोर मुंदडा यांचा फोटो भिंतीवर लावलेला आहे. बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर ही बाब प्रसिद्ध झाली आहे. वरील प्रकाराबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या घटनेचा निषेध करुन कायदेशीर कार्यवाही करण्याची लेखी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. परंतू, अद्याप कायदेशीर कार्यवाही झाली नाही.
वरिल चारही जण गैर अनुसूचित जातीचे आहेत. मी अनुसूचित जाती पैकी चांभार जातीचा सदस्य आहे. माझ्या सहित सर्व अनुसूचित जाती आणि जमातीचा समूह छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अत्यंत आदर करतो. वरिल महापुरुषांच्या शेजारी विमल मुंदडा यांचा फोटो लावून मनिषा बालासाहेब दोडतले, सुनिल बाबूराव मस्के, अक्षय नंदकिशोर मुंदडा, नंदकिशोर शिवभगत मुंदडा यांनी अनादर केला आहे. तरी त्यांच्या विरुद्ध माझी लेखी कायदेशीर फिर्याद आहे. तरी त्यांच्या विरुद्ध ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करुन त्वरित कार्यवाही करण्यात यावी हि नम्र विनंती, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावर ज्ञानोबा लक्ष्मणराव कांबळे यांची स्वाक्षरी आहे. या निवेदनाची प्रत पोलिस अधीक्षक, बीड आणि नागरीक हक्क संरक्षण दल बीड यांना देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!