तुटपुंज्या अनुदानातून गरिबांच्या घरकुलांचे स्वप्न साकार होणार का ? महागाईमुळे घरकुले पुर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना करावी लागणार पदरमोड
शिराळा / प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजनेनील दुसऱ्या टप्यातील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीच्या पत्रांचे नुकतेच गावोगावी वाटप करण्यात आले . परंतू वाढत्या महागाईमुळे बांधकाम साहित्याचे व बांधकाम मजुरीच्या दरात दुपटीने वाढलेले दर परिणामी या योजनेतंर्गत शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानातून गोर गरीब लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न पुर्ण होणार का ? असा सवाल या लाभार्थ्यांच्यातुन उपस्थित केला जात आहे .
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत योजना (ग्रामीण) टप्पा २ मधील राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजूरी पत्र व किमान १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता शिराळा तालुक्यातील महाआवास अभियान २०२४-२५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा २ मधील शिराळा तालुक्यात २ हजार १८६ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे मंजुरी पत्र व १हजार ८४४ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळणार आहे.
गोरगरीब कुटुंबियांना आपल्या हक्काचे घर मिळावे म्हणून शासनाकडुन प्रधानमंत्री आवास घरकुल योजना , रमाई आवास घरकुल योजना , मोदी आवास घरकुल योजना , धनगर आवास घरकुल योजना अशा योजना राबविल्या जात आहेत . सध्या प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजुर असलेल्या घरकुलाना शासनाकडुन लाभार्थ्यांना सहा हप्त्यामध्ये १ लाख ५८ हजार ७३० रु अनुदान देण्यात येणार आहे . यामध्ये पहिला हप्ता १५ हजार रु , दुसरा हप्ता ७० हजार रु , तिसरा हप्ता ३० हजार रु व घरकुल पर्ण झाल्यानंतर चौथा हप्ता ५ हजार रु . असे एकुण १ लाख २० हजार रु तर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे २६ हजार ७३० रु तर शौयालयाचे १२ हजार रु असे एकुण १ लाख ५८ हजार ७३० रु अनुदान देण्यात येणार आहे . या अनुदानातुन २५ चौरस मीटर चटई क्षेत्रामध्ये लाभार्थ्याने आपल्या घरकुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे .
सध्या महागाईच्या भडक्यात घरकुलाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या दगड , वाळू , सिमेंट , लाकुड , वीट , जांभा दगड , पत्रा ,आदी बांधकाम साहित्यांचा दरामध्ये कमालीची वाढ झाली आहे . तसेच बांधकाम करणाऱ्या गंवड्यासह इतर मजुरांचे मजुरीचे दरही वाढले आहेत .बांधकामाच्या साहित्यांचे दर वाढल्याने शासनाकडुन मिळणाऱ्या अनुदानामध्ये शासनाने ठरवुन दिलेले बांधकाम पूर्ण करणे हे लाभार्थ्यांच्यासाठी एक अग्नीदिव्यच ठरणार आहे .
यापुर्वी सन २०११ – १२ मध्ये घरकुलसाठी शासनाकडुन ६८ हजार ५०० रु अनुदान दिले जात होते . त्यानंतर सन २०१३ – १४ मध्ये या अनुदानात वाढ करूने ते ९५ हजार रु केले . सन २०१६ – १७ मध्ये या अनुदानात पुन्हा वाढ करून हे अनुदान १ लाख ३८ हजार रु केले . त्यानंतर काही काळाने यामध्ये नाममात्र ५ हजार रु वाढ झाल्याने १ लाख ४३ हजार रु . एवढे अनुदान लाभार्थ्यांना मिळत होते . सध्या या अनुदानात केवळ १५ हजार रु वाढ केल्याचे दिसून येत आहे . गेल्या पाच वर्षात बांधकामाच्या साहित्यामध्ये सुमारे दिडपट ते दुप्पट वाढ झाली आहे . सध्या घरकुल बांधकामाचा खर्च कमीत कमी सुमारे तीन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.परंतू घरकुलासाठी मिळणाऱ्या अनुदानात मात्र त्या पटीत अपेक्षित अशी वाढ झालेली नाही . परिणामी शासन अनुदान व घरकुलाचे प्रत्यक्षातील बांधकाम यांचा ताळमेळ घालताना लाभार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे .
{घर बांधकामासाठी साहित्याचे व बांधकाम मजूरांच्या दरात जवळपास दीडपट वाढ झालेली आहे. वाढलेले दर पाहता घर बांधने अवघड झाले आहे. पंधरा वर्षात फक्त १५ हजार वाढवले आहेत.परिणामी मिळणारे पैसे व होणाऱ्या खर्चाचा ताळमेळ घालने गरीबाच्या आवाक्याबाहेर आहे.शासनाने गांभिर्याने घेऊन घरकुलांच्या अनुदानामध्ये तातडीने वाढ झाली तरच गरीबाना दिलासा मिळेल व हक्काचे घर मिळेल }
मानसिंग पाटील
लाभार्थी बिऊर ता.शिराळा