अंबाजोगाई प्रतिनिधी:–
अकोला जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या थांबायचं नाव घेत नाहीये एकाच महिन्यात चार युवा शेतकऱ्यांनी कर्जापाई मृत्यूला कवटाळलं आहे, तर तीन आत्महत्या ह्या मुर्तिजापूर तालुक्यात झाल्या असून तर काल एक बार्शीटाकळी तालुक्यात झाली आहे, ज्ञानेश्वर मोतीराम धेंगे वय वर्ष ४० रा. निंबि खुर्द तालुका बार्शिटाकळी जी. अकोला असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या कडे ९ एकर शेती होती आणि शेतीवर घेतलेल्या कर्जापायी त्याने आत्महत्या केल्याचं समजते.
महान पिंजर जवळील असलेल्या निंबी खुर्द या गावातील युवा शेतकरी ज्ञानेश्वर हे वडिलोपार्जित शेती करीत होते. आई-वडील म्हातारे असल्यामुळे आणि घरातील एकुलता एक असल्यामुळे शेतीची जबाबदारी ज्ञानेश्वर यांच्यावरच होती. घरातील तसेच शेतीची जबाबदारी एकट्या ज्ञानेश्वर असल्यामुळे आणि वरून सेंट्रल बँकेसह आणखी एका बँकेचे शेतावर कर्ज होते. वाढत्या महागाईने तसेच पिकाला योग्य भाव नसल्याने त्याला दरवर्षी आर्थिक नुकसान सोसावं लागत होते. त्यामुळे तो बँकेचं कर्ज फेडू शकला नाही. सोबतच कर्ज फेडण्यासाठी वारंवार बँकेच्या तकदा लावल्याने तो कंटाळून गेला होता. शेवटी त्याने काल बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड येथील एका शेतात जाऊन गळफास घेतला आणि आपली जीवन यात्रा संपवली त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे.