*आशा स्वयंसेविकांनी थकीत वेतनप्रश्नी धाराशिवमध्ये भव्य मोर्चा काढून धरणे आंदोलन केले*
धाराशिव प्रतिनिधी:–
पाच महिन्यापासून केंद्राचे व दोन महिन्यापासून राज्याकडून मिळणारे मानधन थकल्याने आशा वर्करला आर्थिक अडचणींचा सामना करावा न लागत आहे. बुधवारी आशा वर्कर व गट – प्रवर्तकांच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
केंद्र सरकारकडून मिळणारे ३ हजार रुपयांचे मानधन गेल्या पाच महिन्यापासून थकले आहे. मानधनही दोन महिन्यापासून मिळाले नाही. मानधन वेळेवर मिळत नसल्याने आशा वर्करला कुटूंबाचा गाडा चालविणे मुश्कील होत आहे.राज्याकडून मिळणारे १० हजार रुपयांचे बुधवारी जिल्ह्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी काम बंद ठेवून जिल्हा परिषदेसमोर जोरदार आंदोलन केले. दुपारी झालेल्या रिमझिम पावसातही दुपारी ४ वाजेपर्यंत आंदोलन सुरु होते. भगवान देशमुख, दत्ता देशमुख, नवनाथ धुमाळ आदींसह आशा सेविका सहभागी
केंद्र, राज्य सरकारच्या निधीतील मोबदला दरमहा द्या
जानेवारी ते मे महिन्याचे थकीत मानधन देण्यात यावे, राज्य निधीतून मिळणारे एप्रिलचे मानधन गटप्रवर्तक, अशांना वितरीत करावे, गटप्रवक्तकांना बायोमेट्रिकची सक्ती करु नये, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या कामाचा मोबदला थकीत आहे, तो देण्यात यावा. ऑनलाइन कामांसाठी मोबाइल, सिम व रिचार्जसाठी रक्कम देण्यात यावी, केंद्र व राज्य सरकार निधीतून देण्यात येणारा मोबदला दरमहा द्यावा.