मोरगाव/अर्जुनी तालुक्यातील बाकटी येथील राशन दुकानदाराचा भोंगळकारभार अन्न पुरवठा अधिकारी करतात राशन दुकानदाराची पाठराखण ग्रामस्थांचा आरोप.
गोंदिया प्रतिनिधी –
मोरगाव अर्जुनी तालुक्यात येत असलेला ग्राम बाकटी येथील रासन दुकानदार हा लोकांना वेळेवर राशन देत नाही. आणि लोकांसोबत मुजोरी करून उद्धट बोलतो, व आलेला राशन युनिट नुसार न देता कमी देतो? व त्याच्या वजन काट्यात अर्धा किलोचा तफावत,असल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी,गोंदिया तहसील प्रशासन,मोरगाव अर्जुनी यांना दिली होती? त्या अनुषंगाने प्रशासनाने त्याच्या चौकशी करिता तिन तालुक्यातील पुरवठा अधिकारी यांची टीम तयार केली. यात सालेकसा,सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी,येथील पुरवठा अधिकारी यांची चौकशी करिता नेमणूक करण्यात आली. त्या अनुषंगाने दिनांक 17 /3/ 2025 ला तपासणीसाठी अधिकारी ग्रामपंचायत बाकटी येथे आले यावेळी ग्रामस्थांनी केलेल्या आरोपाची तक्रारकर्त्या कडून चौकशी करण्यात आली.त्याच ग्रामस्थांनी सांगितले की राशन दुकानदार हा राशन आणण्यासाठी गेले. असता लोकांशी असभ्य वागणूक करतो. माल कमी आल्याचे कारण सांगून अनेकांना माल युनिट नुसार न देता पाच किलो कमी देतो आणी त्याचा रासन परस्पर विकतो आणि लोकांनी तिथून आणलेला माल हा घरी आणल्यानंतर जर दुसऱ्या वजन काट्यात मोजला तर अर्धा किलो कमी पडतो. आणि या तक्रारी संदर्भात आम्ही मोरगाव अर्जुनी तालुक्यातील पुरवठा अधिकारी यांच्याकडे गेले असता ते नागरिकांचे सांगणे ऐकण्यापेक्षा राशन दुकानाची बाजू घेत. असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. चौकशीच्या नावावर नावावर अधिकाऱ्यांनी थातूरमातूर चौकशी केली. तरी पण जिल्हाधिकारी साहेब यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून राशन दुकानदार आणि त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.