Dindrud

पालखी महामार्गावर ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले.

दिंद्रुड प्रतिनिधी:–

दिंद्रुड मेहकर-पंढरपूर पालखी महामार्गावर ट्रक दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार चिरडल्याची घटना रविवार (दि. १) रोजी दुपारी अडीच च्या दरम्यान घडली. यात एक जण जागीच ठार झाला आहे.

 

महारुद्र भीमराव लोंढे रा. खालापुरी ता. शिरूर कासार जि. बीड असे मयत व्यक्तीचे नाव असून, तो तेलगावहून माजलगावकडे दुचाकीवरुन जात असताना अपघात घडला. तर, माजलगावहून तेलगावकडे जाणारा ट्रक (एम एच ४४ ७३७१) आणि दुचाकीची समोरासमोर झाली, ज्यात महारुद्र लोंढे जागीत ठार झाला. पालखी महामार्गावरील रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भेगा या अपघातात कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. टालेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महामार्ग बनवणाऱ्या गुत्तेदारावर गुन्हा नोंद करा या भूमिकेत प्रेताचा पंचनामा करण्यास पोलिसांना मज्जाव केला. दरम्यान चार वाजेपर्यंत टालेवाडी फाट्यावर ग्रामस्थांनी गोंधळ घातला होता. सध्या स्थितीत चार वाजेपर्यंत दोन्ही बाजूने दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असून जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत प्रेत उचलू देणार नाहीत ही भूमिका मयत झालेल्या नातेवाईकांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!