गेवराई प्रतिनिधी :
तालुक्यातील रोहितळ येथे अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घराचा दरवाजा तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना शुक्रवार (दि.४) रोजी सकाळी ९ ते २ च्या सुमारास घडली असून एकूण १,२९,५०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.अज्ञात चोरट्यांविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाभरात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.गेवराई तालुक्यातील रोहितळ येथील देवकांत राजकुमार गायकवाड (वय ४९) यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा कपाटातील ५०००० रोख रक्कम,१६ ग्रॅमचे गंठण,४ ग्रॅमचे लॉकेट,२ ग्रॅमचे टॉप गंठण तसेच अंगठी,बोरमाळ,झुबर असा एकूण १,२९,५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची केल्याची घटना शुक्रवार (दि.४) रोजी सकाळी ९ ते २ च्या सुमारास घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.