आता होणार नाही मृतदेहांचीअवहेलना; अत्याधुनिक शववाहिनी करेल तुमचे सांत्वन
जालना प्रतिनिधी : – मृत्यू कोणाचाही असो, कसाही असो, आणि कधीही झाला तरी आपल्याला त्याबद्दल दुःखच होते. त्याहीपेक्षा जास्त दुःख होते ते मृतदेहाची अवहेलना झाल्यानंतर. मृतदेहाची अवहेलना होऊ नये म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करतो परंतु परिस्थिती पुढे त्याला हार मानावी लागते. आता तसे होणार नाही, मृतदेहाची अवहेलना होऊ नये म्हणून जालना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक शववाहिन्या दाखल झाल्या आहेत. या शववाहिनांमुळे मृतदेह घरापर्यंत सुस्थितीत येईल आणि निश्चितच मृतांच्या नातेवाईकांना झालेल्या दुःखाचे या शववाहिणीमुळे काही प्रमाणात का होईना सांत्वन होईल, त्यांच्या दुःखावर फुंकर घालेल अशी शक्यता आहे .या शववाहिन्यासंदर्भात माहिती देत आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे. पहा खालील व्हिडिओमध्ये. या अत्याधुनिक शववाहिनीमध्ये रुग्णालयातून मृताच्या घरापर्यंत जाण्यासाठी कितीही वेळ लागला तरी मृतदेह सुस्थितीत राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. लांबच्या पल्यासाठी वातानुकूलित यंत्रणा तर आहेच, कदाचित ती कमी पडली तर बर्फाच्या लादीसाठी देखील व्यवस्था केली आहे .त्यासोबत लांबच्या पल्यात मृताचे नातेवाईक देखील या शववाहिनी मध्ये बसू शकतील किंवा आराम करू शकतील अशीही व्यवस्था करण्यात आली आहे. आतमध्ये मृतदेहाच्या बाजूला बसण्याची, प्रदक्षिणा घालता येईल अशी ही व्यवस्था आहे .त्याहीपेक्षा शववाहिनी उभी केल्यानंतर गर्दी जर जास्त असेल तर बाहेरून देखील दोन्ही बाजूंनी मृतदेहाचे अंतिम दर्शन घेता येईल अशी ही व्यवस्था आहे. त्यासोबत ध्वनी क्षेपण यंत्रणादेखील कार्यान्वित आहे., आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त झाली तर त्यासाठी बाहेरून वीज पुरवठा घेऊन बॅटरी चार्ज करता येईल अशी ही व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने ही शववाहिनी असल्यामुळे मृतदेहाची अवहेलना होण्याची शक्यताच नाही. त्यामुळे निश्चितच या शववाहिनीदेखील आता रुग्णांच्या दुःखावर काही अंशी फुंकर घालू शकते.