Jejuri

कार-पीकअपचा भीषण अपघात.

जेजुरी : जेजुरी-मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीसमोर बुधवारी (दि. १८) रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास कारने पीकअपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेसह ९ जणांचा मृत्यु झाला तर ४ जण जखमी झाले.

जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनी समोरील श्रीराम हॉटेलबाहेर पीकअप टेम्पोमधील साहित्य उतरविण्याचे काम सुरू होते. यावेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पीकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोतून साहित्य खाली उतरविणारे, हॉटेलमधील मालक व कारमधील व्यक्ती तसेच एका महिलेसह ९ जण जागीच ठार झाले. यासह १ बालक, १ महिला व २ पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी जेजुरी पोलिसांनी तातडीने जाऊन जखमी व मृत व्यक्तींना दवाखान्यात दाखल केले आहे.

अपघातात ज्यांचा मृत्यू झाला त्यांची नावं काय?

१) सोमनाथ रामचंद्र वायसे

२) रामू संजीवन यादव

३) अजयकुमार चव्हाण

४) अजित अशोक जाधव

५) किरण राऊत

६) सार्थक राऊत

७) अश्विनी ऐसार

८) अक्षय शंकर राऊत

अशी अपघातात मृत्यु झालेल्या आठ जणांची नावं आहेत. तर नवव्या मृताची ओळख पटू शकलेली नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!