मा.आ.प्रा.संगीताताई ठोंबरे या उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार.
केज प्रतिनिधी :- केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार प्रा. संगीताताई डॉ. विजयप्रकाश ठोंबरे या दिनांक २८ ऑक्टोबर रोजी केज विधानसभा राखीव मतदार संघातून नामनिर्देशन पत्र सादर करणार आहेत. त्या निमित्त केज शहरातून त्या शक्ती प्रदर्शन करणार आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक धारूर रोड येथून छत्रपती संभाजी महाराज चौकात पुष्पहार अर्पण केल्या नंतर प्रचंड रॅली निघणार आहे. भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सावता माळी चौक, भगवान बाबा चौक, मौलाना आझाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुष्पहार अर्पण करून महापुरुषांना अभिवादन करून त्यांच्या आणि मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने मा. आ. प्रा. संगीताताई डॉ. विजयप्रकाश ठोंबरे या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर त्या मतदार संघातील जनतेशी व प्रसार माध्यमांशी आपली भूमिका आणि निवडणुकी संदर्भात भूमिका मांडणार आहेत. त्या निमित्त सर्व कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केज येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.