केज

केज मध्ये कंटेनरने सात ते आठ वाहनाना धडक देऊन चिरडले, एक महिला ठार तर 20 ते 25 जण जखमी घटनास्थळाहून फरार झालेला कंटेनर लोखंडी सावरगाव नजिक पलटी …..

 

केज (प्रतिनिधी )

 

    बीड कडून भरधाव वेगात निघालेल्या एका कंटेनरने सात ते आठ वाहनाना धडक देऊन चिरडल्याची व यात एक महिला ठार तर 20 ते 25 जण जखमी झाल्याची दुर्देवी घटना आज दुपारी केज मध्ये घडली असून घटनास्थळाहून फरार झालेला कंटेनर पुढे लोखंडी सावरगाव नजिक पलटी झाला आहे.

 

याविषयी प्राप्त माहिती अशी की आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बीड कडून भरधाव वेगात नेकनूर मार्गे केज मध्ये आलेल्या डीडी 01- झेड 97 71 क्रमांकाच्या कंटेनर ने सर्वप्रथम नेकनूर येथे काही जणांना चिरडले व त्यानंतर केज मधील हॉटेल अनिल पासून पुढे सात ते आठ वाहनांना चिरडत व पुढे काही वाहनांना फरपटत नेऊन सदर कंटेनर आंबेजोगाईच्या दिशेने फरार झाला प्राथमिक माहितीनुसार यामध्ये एक महिला ठार तर 20 ते 25 जण जखमी झाले असून यातील आठ ते दहा गंभीर जखमीला आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आल्याचे वृत्त असून आज केज शहरात आठवडी बाजार असल्याने रस्त्यावर तोबा गर्दी असताना या दुर्घटनेत मोठा अनर्थ टळला आहे 

   सदर कंटेनर अनेक वाहनांना धडक देऊन अंबाजोगाईकडे येत असताना वाटेत त्याने चंदन सावरगाव नजिक आणखी एका वाहन चालकास चिरडले असून या दुर्घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केज रोडवर येऊन सदर कंटेनरचा पाठलाग सुरू केला असता हा कंटेनर लोखंडी सावरगाव येथे पलटी झाला असून केज पासून पाठलाग केलेल्या संतप्त जमावाने नंतर हा कंटेनर पेटवून दिल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893835
error: Content is protected !!