केज

अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाचा खून

 

केज प्रतिनिधी:– तालुक्यातील भाटुंबा येथील एका युवकाला अनैतिक संबंधाच्या संशयावरून दोन तरुणांना त्यांची दुचाकी अडवून शेतातील झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यात एकाचा मृत्यु झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी युसुफवडगाव पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे.

 

अधिक माहिती अशी की, केज येथील दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे वय २७ वर्ष रा. भाटुंबा ता. केज व त्याचा मित्र सचिन करपे याला दि. २६ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास सावळेश्वर ता. केज येथील रोहन मरके, सोन्या मस्के तसेच लाडेगाव येथील चार ते पाच जणांनी अडवून त्याला रोहन मस्के यांच्या मामाच्या शेतात घेऊन गेले. तेथे त्याला शेतातील झाडाला बांधून त्या सर्वांनी लाकडी काठी आणि बेल्टने अमानुष मारहाण केली आणि त्या नंतर त्याला जखमी अवस्थेत पावनधाम जवळ असलेल्या रस्त्यावर टाकून दिले. तसेच याची माहिती मारहाण करणाऱ्यांनी दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे याच्या मोबाईल वरून त्याचा भाऊ सिद्धेश्वर धपाटे याला दिली. त्या नंतर सिद्धेश्वर धपाटे आणि गावातील लोकांनी दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे आणि त्याचा मित्र सचिन करपे याला अंबाजोगाई येथे दाखल केले. त्या नंतर काही वेळाने दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे हा मयत झाल्याचे घोषित केले.

 

या प्रकरणी सिद्धेश्वर धपाटे यांच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!