केज प्रतिनिधी:- मराठा सेवक सतिश देशमुख यांचे मराठा मोर्चात असतातना जुन्नर येथे ह्लदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले,हे पाटलांना समजताच संघर्ष योद्ध्यांनी त्यांचे बंधु मराठा सेवक व्यंकटेश देशमुख यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेऊन सांत्वन केले.मराठा सेवक सतिश देशमुख यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही..
केज तालुक्यातील वरपगाव येथून मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईकडे निघालेल्या वरपगाव येथील सतीश देशमुख (वय ४५) यांचा पुणे जिल्ह्यातील नारायणगावजवळ हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला. या दुर्दैवी घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे.
केज तालुक्यातील वरपगाव येथील सतीश ज्ञानोबा देशमुख हे मित्रासोबत मनोज जरांगे यांच्या मुंबई येथे होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते. ते पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे आले असता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यु झाला. मागील तीन वर्षांपूर्वी त्यांच्या एका मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यु झाला आहे. तर दुसरा मुलगा पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.आता त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी नंदुबाई, मुलगा आणि वृद्ध आई असा परिवार आहे.