*कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय पाटील, कार्याध्यक्षपदी राहूल मगदूम यांची नियुक्ती*
कोल्हापूर प्रतिनिधी : –कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पूण्यनगरीचे कोल्हापूर आवृत्ती प्रमुख
विजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिनमानचे वरिष्ठ पत्रकार राहूल मगदूम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे..
कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारिणीची मुदत संपलेली होती.. मात्र नव्या नेमणुका झालेल्या नव्हत्या.. परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी अधिस्वीकृती समितीच्या बैठकीच्या निमित्तानं दोन दिवस कोल्हापुरात होते.. काल कोल्हापुरातील काही मान्यवर पत्रकारांबरोबर चर्चा करून नवे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत..
विजय पाटील आणि राहूल मगदूम यांनी महिनाभरात सर्वांशी चर्चा करून कार्याध्यक्ष शिवराज काटकर यांच्याशी विचार विनिमय करून जिल्हा कार्यकारिणी तयार करावी अशा सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत..
नवीन पदाधिकारी नेमताना ज्या तालुक्यात परिषदेचे काम व्यवस्थित सुरू आहे तेथील पदाधिकारयांना विश्वासात घेतले जावे, तसेच कार्यकारिणीत ग्रामीण भागातील पत्रकारांना योग्य प्रतिनिधींत्व द्यावे असेही पाटील आणि मगदूम यांना सांगण्यात आले आहे..
विजय पाटील आणि राहूल मगदूम यांचे एस.एम.देशमुख यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या..
यावेळी विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, अधिस्विकृती समिती सदस्य जान्हवी पाटील, पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष हरिष पाटणे, लातूर विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष विजय जोशी, मुंबई विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष दीपक कैतके उपस्थित होते..
चिनी मंडी पोर्टलचे संपादक रणधीर पाटील यांची डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य कार्यकारिणीवर लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याचे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले..