लातूर

नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याने घेतला गळफास..

लातूर प्रतिनिधी: लातूर शहराजवळ नांदेड रोडवरील कृषी महाविद्यालयांतर्गत असलेल्या एकलव्य वस्तीगृहातील खोली क्रमांक ३१३ मध्ये एका परप्रांतीय विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केल्याचं निदर्शनास आलं आहे. कृषी महाविद्यालया अंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरातच विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आहे त्यातील एकलव्य वस्तीगृहात दीपक कुमार धनावत या विद्यार्थ्याने खोलीतील पंख्याला गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. या वस्तीगृहातील सफाई कर्मचारी याच्या निदर्शनास हा प्रकार लक्षात आला.

           वस्तीगृहातील प्रत्येक खोलीमध्ये तीन-तीन विद्यार्थी राहतात दरम्यान आणि इतर दोन सहकारी विद्यार्थी खोली बाहेर असताना दीपक कुमार याने गळफास घेत आपला जीव दिला, असा अंदाज वर्तवला जात आहे. दीपक कुमार हा लातूरच्या कृषी महाविद्यालयात बीएससी ऍग्री द्वितीय वर्षात शिकत होता. तो मूळचा राजस्थान येथील राहणारा असल्याची माहिती आहे.गेल्या वर्षीपासून तो लातूरच्या कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. अधिकृत माहिती नाही पण त्याने एमबीबीएस,नीटसाठीही परीक्षा दिली होती. पण, या परीक्षेत त्याला दोन गुण कमी मिळाले या कारणाने त्याच्यावर मानसिक दबाव होता अशीही चर्चा सुरू आहेत.दोन वर्षांपासून दीपक कुमार घनावत हा विद्यार्थी लातूरमध्ये कृषी महाविद्यालयात बीएससी ऍग्री शिकत असताना नीट परीक्षेचीही तयारी करत होता. नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात त्याला १७० गुणांच्या जवळपास गुण मिळाले होते. मात्र, त्याने आपल्या वडिलाना ५४० गुण मिळाले असल्याचे सांगितले होते. वडील त्याला भेटायला येणार असल्याच्या दबावामुळे त्यांने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज त्याच्या खोलीतील इतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. उत्तरीय तपासणीनंतर दीपक कुमार घनावत याचे पार्थिव त्याच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. पुढील तपास पीएसआय मुळे आणि त्यांची टीम करत आहेत. विवेकानंद पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!