Wednesday, April 16, 2025
Latest:
मुंबई

*महिन्याला 1 लाख कमवले तरीही इन्कम टॅक्स देऊ नका– जाणून घ्या नवीन टॅक्सबद्दल सर्व अपडेट काय स्वस्त काय महाग*


प्रेस क्लब

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा दिला देउन पीएम मोदी यांनी मास्टर स्ट्रोक दिला आहे. या बजेटमधून इनकन टॅक्सबाबत मोठी घोषणा केली आहे. यापुढे 12 लाख रुपयांपर्यंत सर्वसामान्याला कोणताही कर द्यावा लागणार नसल्याने अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल.

नव्या टॅक्स रिजीममधून जे लोक टॅक्स भरणार आहेत त्यांनाच फक्त ही सूट मिळणार आहे. जुन्या टॅक्सवर मात्र ही सूट मिळणार नाही. नव्या टॅक्स रिजीममधून अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 12 लाखपर्यंत कोणताही कर आकारला जाणार नाही. त्यामुळे आता नव्या टॅक्स रिजीममधून अर्ज करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टॅक्स पेअर्सवर जास्तीचा भार पडत असल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमधून ही घोषणा केली आहे.

आता तुम्ही 1 लाख रुपये महिन्याला कमवले तरी तुमच्या पगारातून टॅक्स कापला जाणार नाही. त्यामुळे आता 1 लाख रुपयांपर्यंत पगार असणाऱ्या सगळ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घोषणेनंतर शेअर मार्केटमध्ये पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. एफएमसीजी स्टॉक्स वधारले आहेत. हे बजेट गेमचेंजिंग बजेट असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक बदल बघायला मिळतील. एफएमजी स्टॉक चांगले नंबर्स देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

इतकंच नाही तर जुन्यामधून सगळ्यांना नवीन टॅक्समध्ये शिफ्ट करण्यासाठी ही योजना केली जात आहे असंही काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

*कर स्लॅबमध्ये बदल*

0 ते 4 लाख शून्य
4 ते 8 लाख 5%
8 -12 लाख 10%
12 ते 16 लाख 15%
16 ते 20 लाख 20%
20 ते 24 लाख 25%
24 लाख रुपयांपेक्षा जास्त 30%

*गेल्या काही वर्षांमध्ये आयकर सवलत मर्यादा*
2005: Rs 1 लाख
2012: Rs 2 लाख
2014: Rs 2.5 लाख
2019: Rs 5 लाख
2023: Rs 7 लाख
2025: Rs 12 लाख.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर, निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? केंद्र सरकारच्या 2025 च्या अर्थसंकल्प मांडताना गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल, असं नमूद केलं. तसेच शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या. निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजना आणणार असल्याचं जाहीर केलं. किसान क्रेडिटकार्डची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांवर केली जाणार अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी यावेळी केली. केंद्र सरकारच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झालंय,

*2025-26 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त?*

– LED-LCD च्या किंमती कमी होणार

– टीव्हीचे पार्ट्स स्वस्त होणार

– मोबाईल स्वस्त होणार

मोबाईल स्वस्त होणार

– मोबाईलच्या बॅटरीसंदर्भातील 20 भांडवली वस्तूंना सूट

– कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 56 औषधं कस्टम ड्युटी फ्री

– लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर

– भारतात तयार होणार कपडे स्वस्त होणार

– चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार

– गोठवलेल्या माशांच्या पेस्टवरील मूलभूत सीमाशुल्क 30% वरून 5% पर्यंत कमी करणार

*2025-26 च्या अर्थसंकल्पात महाग काय?*

– इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल डिस्प्लेवरील सीमाशुल्कात वाढ

– फॅबरिक

– बऱ्याच आवश्यक वस्तूंवर सीमाशुल्क कमी किंवा सूट दिली जाणार आहे. परंतु काही वस्तू महाग होणार आहेत, विशेषतः तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात.

*मोदी सरकारची मोठी घोषणा; कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स?*
0 ते 4 – Nil
4 ते 8- 5 टक्के
8 ते 12 लाख – 10 टक्के
12 ते 16 लाख – 15 टक्के
16 ते 20 लाख – 20 टक्के
20 ते 24 लाख – 25 टक्के
24 लाखापुढे – 30 टक्के

*2024-25 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त झालं होतं?*

सोनं, चांदी
सोनं-चांदीवर 6.5 टक्के ऐवजी 6 टक्के आयात कर
मोबाईल हँडसेट
मोबाईल चार्जरच्या किंमती
मोबाईलचे सुटे भाग
कॅन्सरवरची औषधे
पोलाद, तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर करसवलत
लिथियम बॅटरी
इलेक्ट्रीक वाहने
सोलार सेट
चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तू
विजेची तार
*2024-25 च्या अर्थसंकल्पात काय महाग झालं होतं?*

प्लास्टीक उद्योगांवर कर
प्लास्टीक उत्पादने
सिगारेट
विमान प्रवास
पीव्हीसी फ्लेक्स शीट
मोठ्या छत्र्या
*2025-26 च्या अर्थसंकल्पामधील मोठे निर्णय*

– डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना – पुढील 6 वर्षे तूर, मसूर आणि इतर डाळींच्या उत्पादनावर भर
– कापसाच्या उत्पादनासाठी 5 वर्षांचे मिशन – यामुळे देशातील वस्त्र उद्योगाला चालना मिळणार
– किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा ₹3 लाखांवरून ₹5 लाखांपर्यंत वाढवली
– बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन – छोट्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फायदा
– लघुउद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड योजना – पहिल्या वर्षी 10 लाख क्रेडिट कार्ड जारी केली जाणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!