Wednesday, April 16, 2025
Latest:
मुंबई

*अखेर धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यानू केलेले आरोप फेटाळले*

मुंबई प्रतिनिधी: – अंजली दमानिया यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. हे केवळ त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले गेले आहेत. कृषी विभागात मी मंत्री असतानाच्या काळात झालेली सर्व खरेदी ही शासन नियमानुसारच झाली असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. मात्र, असे सनसनाटी आरोप करायचे, धादांत खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवायची, याव्यतिरिक्त याच्यात मला काहीही आढळत नसल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. गेल्या 59 दिवसापासून माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे. ते का चालू आहे? कोण चालवतेय? हे मला माहिती नाही, असे देखील मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्या विभागात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिले आहेत. आम्ही शांत बसलो म्हणजे आम्हाला बोलता येत नाही, असा होत नाही. मुख्यमंत्र्यांचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना ऐवजी दमानियांना माहित आहे का? असा प्रश्न देखील मुंडे यांनी उपस्थित केला. अंजली दमानिया यांचा खोटेपणा हा केवळ मला बदनाम करण्यासाठी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अंजली दमानिया यांनी आजपर्यंत केलेले कोणतेच आरोप खरे निघाले नसल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.

अंजली दमानिया जेव्हापासून आरोप करतात तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी केलेला एकही आरोप सिद्ध झाला आहे का? असा प्रश्न देखील धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. या आधी ज्या नेत्यांवर त्यांनी आरोप केले, त्या नेत्यांकडे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. असे देखील मंडे यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख यांचे आरोपी मारले गेले आहेत, असा दावा देखील दमानिया यांनी केला होता. हा देखील दमानियांचा खोटेपणा होता, असे देखील मुंडे यांनी म्हटले आहे. आरोप करण्याचे काम ज्यांनी केले, त्यांना शुभेच्छा. मात्र, माझे राजकीय आयुष्य मायबाप जनतेवर अवलंबून असल्याचा दावा देखील मुंडे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!