मुंबई

रेशनकार्डमध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई – केवायसी पूर्ण करा : अन्यथा बंद होईल लाभ,…

मुंबई प्रतिनिधी : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटूंब योजनेअंतर्गत शासकीय अनुदानित अन्न धान्याचा लाभ सुरु ठेवण्यासाठी कुटूंबातील रेशनकार्डमध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई – केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानदारांशी संपर्क करुन तात्काळ ई – केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असं आवाहन अंबाजोगाई तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ई – केवायसीसाठी संबंधित लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानात समक्ष उपस्थित राहून ई – पॉश मशिनद्वारे ई – केवायसी पूर्ण करावी, किंवा राज्य सरकारनं एनआयसीच्या सहकार्यानं लाभार्थ्यांच्या सोयीसाठी सुरु केलेल्या मेरा ई – केवायसी ॲपच्या माध्यमातून आपल्या मोबाईलमध्ये ई – केवायसी पूर्ण करावी, असं सांगितलं आहे. ई – केवायसी पूर्ण न केल्यामुळे अन्नधान्याचा लाभ बंद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत लाभार्थ्यांची राहील, याची नोंद घ्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!