संघानी इस्टेट,अनंत माने चौक श्रेयस येथील मुख्य रस्त्याच्या बांधकामामध्ये दिरंगाई तसेच निष्कृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते केतन भोज यांची तक्रार
संबंधित रस्त्याच्या कंत्राटदाराकडून पगडी कॅम्पच्या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृतपणे लेबर कॅम्प उभारणी; कामगारांच्या आरोग्याशी खेळ
घाटकोपर,(प्रतिनिधी);संघानी इस्टेट,अनंत माने चौक श्रेयस येथील मुख्य रस्त्याचे बांधकाम चालू आहे.या रस्त्याच्या बांधकामामध्ये संबंधित रस्त्याच्या कंत्राटदाराकडून सतत दिरंगाई केली जात आहे.तसेच निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम काम होत असल्याचे दिसून येत असून वारंवार सतत दोन ते तीन दिवसात घाई गडबडीत रस्त्यावर लगेचच स्लॅब टाकले जात आहे.तसेच सदरील रस्त्याच्या बांधकामाबद्दल आणि मजबुतीकरणाबद्दल संबंधित कंत्राटदाराकडून कोणत्याही प्रकारची दक्षता घेतली जात नसून,त्यामुळे याठिकाणी या रस्त्याच्या भविष्यातील टिकावू व मजबुतीकरणाचा प्रश्न निर्माण होत आहे,तरी या रस्त्याचे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे होत असल्याचे सध्या स्थितीत दिसत आहे.याशिवाय वॉलचे काम देखील तसेच पडून आहे.त्यामुळे या रस्त्याचे बांधकाम संथगतीने सुरू असून,तसेच संबंधित रस्त्याचा कंत्राटदार या कामामध्ये वेळकाढूपणा करत असून यामुळे याठिकाणाहून येजा करणाऱ्या नागरिकांना देखील याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.तरी या रस्त्याचे बांधकाम तत्काळ पूर्ण करावे,आणि याशिवाय या रस्त्याच्या कंत्राटदाराकडून पगडी लेबर कॅम्प च्या खाजगी जागेवर अतिक्रमण करून अनधिकृतपणे लोखंडी पत्र्याच्या लेबर कॅम्पची उभारणी करण्यात आली असून,येथे असणाऱ्या अस्वच्छतेमुळे कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ही ऐरणीवर आला असून संबंधित रस्त्याचा कंत्राटदार व संबंधित प्रशासन हे कामगारांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे याठिकाणी दिसत आहे.तरी संबंधित रस्त्याच्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते केतन भोज हे संबंधित प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल करणार असून याबाबत पाठपुरावा करणार आहेत.तसेच संबंधित कंत्राटदारावर याबाबत योग्यती कारवाई न केल्यास याविषयी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते केतन भोज यांनी संबंधित प्रशासनाला दिला आहे.