मुंबई

उमाकिरण’ प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा.

मुंबई प्रतिनिधी:–

 ‘उमाकिरण’ शैक्षणिक संकुल प्रकरणात घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महिला आयपीएसअधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते विधानसभेत निवेदन करताना बोलत होते. 

        विधानसभेत आ. चेतन तुपे यांनी हा विषय उपस्थित केला होता, त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री फडणवीस  की बीडमध्ये विद्यार्थिनीचे लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला आहे. पालकांनी हिंमतीने तक्रार केल्याने प्रकार उघडकीस आला. यात पोलीसांनी फक्त दोन दिवसांची कोठडी का मागितली? हे संशयास्पद आहे .याची चौकशी केली जाईल. एक मुलगी समोर आली पण किती मुलींसोबत हा प्रकार झाला याची शक्यता आहे त्यासाठी आपण निर्णय केला आहे. वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकाऱ्याअंतर्गत ही चौकशी केली जाईल. कुणाचा वरदहस्त आहे का? याचीही चौकशी करूआमच्या मुलींना योग्य न्याय मिळावा यादृष्टीने प्रयत्न करू. कालबद्ध पद्धतीने एसआयटी चौकशी करेल. सर्व मुलींना न्याय मिळेल. नराधमांना कठोर शिक्षा मिळेल, त्यांना कुणी वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही शिक्षा मिळेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893822
error: Content is protected !!