पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरात… स्मृती मंदिरासह दिक्षाभूमीला वंदन..
नागपूर प्रतिनिधी:-
नागपुरातील हिंसाचारच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज नागपूर दौरा होत आहे. परिणामी प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त तैनात करत जोरदार तयारी केली आहे. अशातच शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधानांचा स्वागत करणारे होर्डिंग नागपूर शहर आणि ग्रामीण भाजपकडून मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहे. त्यापैकी बहुतांशी होर्डिंग वर ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा दिसून येत असून या बॅनर्सची सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे.
यावेळी त्यांनी स्मृती मंदिरात त्यांनी आरएसएस संस्थापक डॉ. हेडगेवार यांना पुष्पांजली वाहिली. पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी रेशम बाग येथील आरएसएस मुख्यालयात दुसरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख माधव सदाशिव गोलवलकर यांना श्रद्धांजली वाहिली. तत्पूर्वी, मोदींचे बाबा साहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर अनेक नेत्यांनी स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी संघाच्या जुन्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांचे जुने दिवस आठवले. मोदी म्हणाले की, आजचा दिवस माझ्यासाठी सौभाग्याचा आहे. आज नवीन वर्षात इथे असणे हे भाग्याची गोष्ट आहे.
स्मृती मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभ्यागत पुस्तिकेत स्वाक्षरीही केली. पंतप्रधान मोदींनी लिहिले, गुरुजींना अनेक अनेक नमस्कार. त्यांच्या आठवणींना उजाळा देत स्मृती मंदिरात येऊन मला खूप आनंद झाला आहे. भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटनात्मक ताकदीच्या मूल्यांना समर्पित हे स्थान नेहमीच राष्ट्राची सेवा करेल. ती मला नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. संघाच्या दोन मजबूत स्तंभांचे हे स्थान देशाच्या सेवेसाठी समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी उर्जेचा स्रोत आहे. आपल्या प्रयत्नांमुळे भारतमातेचा गौरव नेहमीच वाढत राहील.यानंतर, पंतप्रधान मोदी दीक्षाभूमीवर पोहोचले आणि डॉ. बी.आर. आंबेडकरांना आदरांजली वाहिली. हे तेच ठिकाण आहे जिथे १९५६ मध्ये डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. यानंतर, पंतप्रधान मोदी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणीकेली. ते सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड आणि अॅम्युनिशन फॅसिलिटी सेंटरलाही भेट देतील.