Pandhrpur

पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दौंड प्रतिनिधी:–

दिंडी सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक व आध्यात्मिक उत्सव मानला जातो. या काळात संपूर्ण राज्यात भक्तीमय वातावरण, उत्साह आणि चैतन्याची लहर पाहायला मिळते. वारीच्या निमित्ताने संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी ‘माऊली माऊली’चा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. आता या वारीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

           पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून लुटल्याची घटना समोर आली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरकडे जाताना वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते. त्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरून आले. या दोन जणांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला.यानंतर दोन जणांनी वारकऱ्यांना लुटून नंतर अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केले आहेत. या घटनेमुळे दौंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस अज्ञातांचा शोध घेत असून या आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893839
error: Content is protected !!