दै युवक आधारचा दुसरा वर्धापनदिन व पुरस्कार सोहळा संपन्न
पनवेल प्रतिनिधी:-
पनवेल आणि महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘दैनिक युवक आधार’ या वृत्तपत्राचा दुसरा वर्धापनदिन सोहळा रविवार दि ७ सप्टेंबर रोजी उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तिमत्त्वांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सोहळ्याचे उद्घाटन उद्योगपती सुधीर कटेकर, न्यूज १८ लोकमतचे सहसंपादक विलास बडे, साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे आणि प्रसिद्ध अभिनेत्री माधवी जुवेकर,उद्योगपती सुधीर कटेकर
यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाला बाल कलाकार अर्जुनी सस्ते, समीर पाडळकर,सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विलास बडे यांनी सांगितले, की प्रत्येक व्यक्तीने संधी आल्यावर आपला कणा दाखवायला पाहिजे. जिथे अन्याय होतो त्या ठिकाणी पत्रकारांनी व जनतेने आपली भूमिका स्पष्ट करून, न्याय मिळवण्यासाठी झटले पाहिजे, तसेच “ज्या ठिकाणी आपली स्पष्ट भूमिका मांडावी अशी वेळ येते, तिथे मौन पाळणे योग्य नाही. पत्रकारिता हे केवळ बातम्या देण्याचे काम नसून, ती एक सामाजिक जबाबदारी आहे. समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी आपण सक्रिय भूमिका बजावली पाहिजे.”असे शब्द त्यांनी व्यक्त केले. तर त्यांनी या वृत्तपत्राने अल्पावधीत केलेल्या सत्यासमाजहिताच्या कामाचा उल्लेख केला.
निलेश खरे यांनी म्हणाले, “स्थानिक प्रश्नांना न्याय देणे, सामान्यांच्या अडचणी मांडणे आणि सकारात्मक घटनांना वाचा फोडणे हे पत्रकारितेचे खरे ध्येय आहे. ‘दैनिक युवक आधार’ हे काम प्रभावीपणे करत वाचकांचा विश्वास संपादन करत आहे.”
माधवी जुवेकर यांनी पत्रकारिता आणि कलाक्षेत्र या दोन्हीचा समाजावर होणाऱ्या प्रभावावर भर दिला. त्यांनी सर्वांना नागरीकशास्त्र अभ्यासून त्या मूल्यांप्रमाणे वागण्याचा आग्रह धरला आणि युवक आधारच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.दै युवक आधारचे संपादक संतोष शिवदास आमले यांनी सांगितले की, त्यांचे पत्रकारितेचे संघटन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कार्यरत राहील. कार्यक्रमाच्या शेवटी दोन वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील सामाजिक उपक्रमांचा संकल्प व्यक्त करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र संपादक अजय कापरे, सहसंपादक मुकुंद कांबळे, कार्यकारी संपादक जगन्नाथ रासवे, उपसंपादक विलास गायकवाड, प्रदीप पाटील, विजय दुंद्रेकर, एम. डी. भोईर, राजू शिंदे, मच्छिंद्र पाटील, मारुती सत्रे, जगदीश क्षीरसागर, अनुराग आमले, शंतनु भालेराव, आदित्य शेटे, आर्यन शेटे, राहुल माने, कैलास नेमाडे, प्रसाद हनुमंते, कैलास रक्ताटे, कार्यक्रम नियोजक विशाल सावंत आणि नियोजन समिती अध्यक्ष बाळा झोडगे यांसह सर्व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे लाभले.होते. या कार्यक्रमाला पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वाचक आदीची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या मान्यवरांचा सन्मान:
या प्रसंगी शिक्षण, कला-संस्कृती, सामाजिक कार्य, आरोग्य, उद्योजकता यासह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये अविनाश कदम (सेवारत्न), समीर शेख (शिवसंदेश रत्न), हरिश आंधळे (समाज रत्न), अनिल इरले (कामगार रत्न), श्रीकांत नवले (दीप रत्न), सज्जन गायकवाड (उद्योग रत्न) यांच्या समवेत शिवाजी थोरवे, अजित महामुनकर, मच्छिंद्र झगडे, किरण चावला आदीचा समावेश होता.