परळी

सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाची विटंबना: १६ तासांनंतरही उत्तरीय तपासणी करण्यात आली नाही

 सिरसाळा प्रतिनिधी:-

सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे, जिथे मृतदेहाची तपासणी करण्यात विलंब झाला. ३१ जानेवारी रोजी चार वाजता येथील डॉ,बाबासाहेब आंबेडकर चौकातील तारा पान शॉप च्या पाठीमागील बाजूस मृतदेह आढळून आला होता तो मृतदेह सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला होता, परंतु आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी अकरा वाजेपर्यंत त्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली गेली नव्हती. त्यामुळे मृतदेहाच्या तपासणीसाठी होणारा विलंब हा सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मृतदेहाची विटंबना केली गेली असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.नागरिकांनी याबाबत प्रशासनावर गंभीर आरोप केले असून, ते म्हणाले की, मृतदेहाच्या तपासणीसाठी १६ तासांचा विलंब होणे अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या अनुपस्थितीमुळे हा विलंब झाला आहे.त्यमुळे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी मृतदेहाची विटंबना करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी कुलकर्णी यांना निलंबित करावी अशी मागणी केली जात आहे.

*वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांची अनुपस्थिति*
सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाची तपासणी होण्यास विलंब झाला, हे सर्व नागरिकांच्या आणि कुटुंबीयांच्या मते वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या व कर्मचार्यांच्या नियमित अनुपस्थितीमुळे आहे. १ फेब्रुवारी रोजी अकरा वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी कुलकर्णी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते त्यामुळे मृतदेहाची विटंबना झाली असल्याचे बोलले जात आहे. तसेच, सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी कुलकर्णी नियमितपणे हजर नसतात. ओपीडी सेवा देखील अपेक्षेप्रमाणे चालत नाही, आणि दुपारनंतरची ओपीडीही बंद असते. या केंद्राचा कार्यक्षमतेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

*कुटुंबीयांच्या आक्रोशाचा परिणाम*
कुटुंबीयांची भावना व्यक्त करतांना त्यांनी प्रशासनाची निष्क्रियता आणि अनास्था कडवट शब्दात व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, “तपासणीमध्ये विलंब झाल्यामुळे आम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. मृतदेहाच्या तपासणीसाठी असलेला हा विलंब अत्यंत खेदजनक आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!