परळी

*यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे शनिवारी वार्षीक स्नेहसंमेलन ; कार्यक्रमास उपस्थित राहावे-विलास खाडे*

बीडचे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांच्या हस्ते उद्घाटन तर कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेचे अध्यक्ष प्रदिप खाडेची उपस्थितीत लाभणार.

परळी वैजनाथ / दिंद्रुड (प्रतिनिधी) :-कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेच्या संगम फाटा दिंद्रुड येथील यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दि. २९ एप्रिल रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले असुन या संमेलनास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक विलास खाडे व यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व शिक्षक वृंद यांनी केले.

यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे शनिवार दि.२९ एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून बीड चे सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा कै.रामभाऊ आण्णा खाडे संस्थेचे अध्यक्ष प्रदिप खाडे व प्रमुख उपस्थितीत अबाजोगाईचे प्रचार्य विक्रम सारक, उद्योजक सुरेश नाना फड, दिंद्रुड पो.स्टे.चे एपीआय खोडेवाड, विनायक कन्स्ट्रक्शन, अंबाजोगाचे मनोज गीते, डी.बी. क्षीरसागर (सहाय्यक संचालक), श्री. दादासाहेब मुंडे (सामाजिक कार्यकर्ते), लक्ष्मण बारगजे (जिल्हा निरीक्षक) हे उपस्थितीत राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रदीप रोडे (संस्थापक प्रा. देवगिरी प्रतिष्ठान, बीड), साहेबराव बडे (अध्यक्ष लोकशाही विद्यालय), श्री. शिवाजीराव चाटे (प्रा. यशवंतराव चाटे शिक्षण संस्था, कैज), श्री. राजाभाऊ चाटे (प्रा. राजवैभव सेवाभावी संस्था, केज), जनकराव उबाळे (पूर्व जनकल्याण सेवाभावी संस्था, सिरसाळा), अजय चाटे (गजानन विद्यालय प्रसारक मंडळ केज), अनंत धुमाळ (प्री गुरुकुल पब्लिक स्कूल. तेलगाव), बाळासाहेब राठोड (कृष्णकेसरी सेवाभावी संस्था धारूर), सचिन सानप (गणेशानंद शिक्षण संस्था) आदींची उपस्थिती लाभणार आहे.

दरम्यान वार्षिक स्नेहसंमेलन या कार्यक्रमास शिक्षणप्रेमी नागरिक, विद्यार्थी व पालक तसेच नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आपल्या स्कुलचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला. तरी आपण सह-कुटुंब सहपरिवार उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संचालक विलास खाडे व यश इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व शिक्षक वृंद यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!