*ना.पंकजाताई मुंडेंनी जागवल्या जिजांच्या अनेक आठवणी* *साहेबानंतर मुंडे कुटुंबियांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिले*
परळी वै.(प्रतिनिधी)-
माजी आमदार स्व.आर.टी.जिजा देशमुख यांच्या गंगापुजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह.भ.प.यशवंत महाराज मुंबई यांची सुश्राव्य किर्तन सेवा संपन्न झाली. नाशीवंत देह जाणार वाया या अभंगाद्वारे त्यांनी अध्यात्म शक्तीची ताकद भाविकांना पटवुन दिली. याप्रसंगी राज्याच्या पर्यावरण, पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडेंची उपस्थिती होती. प्रसंगी बोलताना जिजांच्या अनेक आठवणीला उजाळा दिला. अशा प्रकारे जिजाचा फोटो पहावा लागेन याची कल्पना कधीच केली नाही. स्व.मुंडे साहेबानंतर माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार्या जिजांनी पालकत्वाच्या भुमिकेत काळजी घेतली. त्यांचं अचानक जाणं मनाला वेदनादायी असुन तो धक्का कधीच विसरू शकत नाही या शब्दांत मंत्री महोदयांनी आठवणीला उजाळा दिला.
स्व.आर.टी.देशमुख यांच्या गंगापुजनानिमित्त निवासस्थानी ह.भ.प.यशवंत महाराज पाटील, मुंबई यांच्या सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाशीवंत देह जाणार हा वाया या अभंगाद्वारे त्यांनी जन्माला आलेला प्रत्येक माणुस जाणारच पण जिवंतपणी ईश्वर साक्षीनं केलेली जनसेवा कर्माधिष्ठीत जीवनाचा भाग म्हणावा लागतो. जिजा गोरगरिबांचा कैवारी म्हणुन त्यांच्याकडे पाहिल्या जात होते. या कार्यक्रमासाठी राज्याच्या पर्यावरण, पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडेंची उपस्थिती होती. किर्तन सेवेनंतर संबोधित करताना खरं तर त्यांना आश्रु आवरता आले नाहीत. अनेक जिजांच्या आठवणीला उजाळा दिला. अशा प्रकारे फोटो त्यांचा पहावा लागेल कल्पना कधी केली नाही हे सांगताना साहेबांच्या नंतर आमच्या रात्रंदिवस डोळ्यासमोर पहारेकर्याप्रमाणे त्यांनी केलेले पालकत्व आणि लावलेला जीव हे आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. जिजा आमच्यासाठी कौटुंबिक आधार होते. परिवारातला घटक म्हणुन संकटात त्यांनी अबोल वृत्तीने दिलेली साथ कधीच विसरू शकत नाही. ताईसाहेब हे नाव मला जिजानंच दिलं. त्याचं कारण साहेब त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हते. दिवाळी तथा इतर उत्सवात कौटुंबिक स्नेह संबंध ठेवताना अधुनमधुन जिजा घरी बोलवायचे. त्यांनी केलेले प्रेम विसरू शकत नाहीत. खरं तर अशी माणसं आयुष्यात मिळणं भाग्य लागतं. नव्या पिढीनं त्यांचा आदर्श निश्चित घ्यावा. कारण जिजाकडून खुप काही घेण्यासारखं, निष्ठा, संयम, संघर्ष, आपलेपणा, जिव्हाळा हे सारे सद्गुण त्यांच्या अंगी होते. स्वभावातली लवचिकता ज्यामुळे सकारात्मकता नेहमीच मिळत असे. जिजा जिथे तिथे खर्या अर्थाने आनंदातच रहावे अशी प्रार्थना त्यांनी ईश्वराला स्मरून केली. यावेळी जेष्ठ बंधु एम.टी.नाना देशमुख, जे.टी.देशमुख, सुपुत्र राहुल, डॉ.अभिजित, रोहित यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.