परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील नामांकित आर्थिक संस्था असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, महाविकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक ताकदीने लढवली जात आहे. पॅनलचे प्रमुख राजेभाऊ फड यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथ परिवर्तन विकास पॅनलची स्थापना करण्यात आली आहे. पॅनलच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून, सर्व उमेदवार आणि महाविकास आघाडीचे नेतेमंडळी मतदारांच्या वैयक्तीक गाठीभेटी घेत आहेत. सभासद मतदारांतून त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी येत्या 10 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने वैद्यनाथ परिवर्तन विकास पॅनलची स्थापना करण्यात आली असून, पॅनलकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेभाऊ फड हे भटक्या विमुक्त मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तर तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिंदे आणि वैजनाथ धमपलवार हे सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणुकीस उभे आहेत. शनिवारपासून प्रचाराला सुरुवात करण्यात आली असून सर्व उमेदवार मतदारांच्या वैयक्तीक गाठीभेटी घेत आहेत. सभासद मतदारांकडून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदाच्या निवडणुकीत वैद्यनाथ परिवर्तन विकास पॅनलच्या उमेदवारांचा विजय निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे.