अज्ञात आरोपी फरार; शहरात एकच खळबळ,,,!
परळी प्रतिनिधी
रेल्वे स्थानक बाजूच्या परिसरात अज्ञात व्यक्तीने पाच वर्षाच्या चिमुरड्या मुलीला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना आज रोजी रविवार दि 31 दुपारी चार साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली असून या घटनेबद्दल शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईच्या माहितीनुसार, पोटाची खळगी भरण्यासाठी पंढरपूर येथील एक जोडपे आपल्या पाच वर्षीय मुलीला घेऊन कामाच्या शोधात परळीला रेल्वेने आले असता, सकाळच्या सुमारास रेल्वे परळी वैजनाथ स्थानकावर आली. या ठिकाणी हे पती-पत्नी आपल्या मुलीसह उतरले. यातील पीडित बालिकेची आई दोन-तीन दिवसापासून आजारी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरच थोडा वेळ आराम करून आपण बाहेर जाऊ असा विचार करून ती आपल्या मुलीला कुशीत घेऊन त्याच ठिकाणी झोपली. पिडित मुलीचे वडील स्थानकातच थोडेसे बाजूला गेलेले होते. दरम्यान तेवढ्या कोणीतरी त्या महिलेस खाण्यासाठी भाजी दिली. व त्याचबरोबर लागलीच काही वेळात या मुलीच्या आईला झोप लागली व मुलगी तिच्या अवतीभवतीच होती. याच दरम्यान एकटी मुलगी बघून अज्ञात पशु वृत्तीच्या अज्ञाताने तिला त्या ठिकाणाहून उचलून नेत गैरकृत्य केले. पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार करून हा अज्ञात हैवान तिथून निघून गेला. ही मुलगी रडत तिच्या आईकडे आल्यानंतर तिच्या आईने काय झाले याचा शोध घेतला असता, तिच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव बघून तिच्यावर गैरप्रकार झाल्याचे तिच्या लक्षात आले. या पीडित बालिकेला परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले असून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे.माणुसकीला काळिमा फासणा-या या घटनेचा तपास संभाजी नगर पोलिस करत आहेत.