पाटोदा

*जागतिक महिला दिनी पोलीस कर्मचाऱ्यानेच केला बलात्कार, बीड जिल्हा हादरला*

पाटोदा(प्रतिनिधी):-

जागतिक महिला दिनीच एका पोलीस कर्मचाऱ्याने एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना बीड जिल्ह्यातील पाटोदा या ठिकाणी घडली असून या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

 

पुण्यात स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर बलात्कार झाला. यावरुन राज्यभरात संतापाची लाट पसरली. हे प्रकरण ताजं असतानाच बीडमध्ये आणखी एका अत्याचाराची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

*रक्षकच झाला भक्षक!* 

मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा पोलीस ठाण्याचे अमलदार गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावले आणि पाटोदा स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही बसने महिला पुण्याहून बीडला येत होती. तिला बसमधून उतवरुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

 

पीडित महिला काही कारणास्तव पाटोदा पोलीस ठाण्यात येत होती. त्याच दरम्यान ती अमलदार उद्धव गडकर यांच्या संपर्कात आली. त्यांच्यात फोन नंबरची देवाण घेवाण झाली. संधीचा फायदा घेत आरोपीने महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले. स्टेट बँकेच्या बाजूला घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. पण चोरीचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत आरोपीने पीडितेवर अत्याचार सुरु ठेवले.

 

फिर्यादी महिलेने ही घटना दुपारी १ च्या सुमारास घडल्याचे पोलिसांना सांगितले. पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन महिलेने पोलीस निरीक्षक यांच्या समोर तक्रार दाखल केली. कारवाईला सुरुवात होईपर्यंत ती पोलीस ठाण्यात बसून होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. तसेच अमलदार गडकरच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!