Wednesday, April 16, 2025
Latest:
पुणे

हिंजवडी येथे कंपनी चे कर्मचारी घेऊन निघालेल्या टेम्पोला आग चार जनांचा होरपळून मृत्यू ..

बातमी शेअर करा.

पिंपरी प्रतिनिधी:-

एका कंपनीचे कर्मचारी घेऊन जाणाऱ्या (Pune) टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक भीषण (Fire) आग लागली. या दुर्घटनेत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील हिंजवडी परिसरात बुधवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्स कर्मचारी घेऊन निघाली होती. त्यावेळी टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये अचानक आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे काहींना बाहेर पडण्याची संधी मिळाली (Pune) नाही, तर काही जणांचा मृत्यू झाला. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा इंजिनमधील बिघाडामुळे ही दुर्घटना घडली असण्याची (Fire) शक्यता वर्तविण्यात येत आहे.याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान,
हिंजवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले असून, आगीमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून, सध्या संपूर्ण परिसर तपासण्यात येत आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना हिंजवडीतील रूबी हॉल क्लिनिक आणि अन्य जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!