ताज्या घडामोडी
पुणे (प्रतिनिधी ):-
एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या आयटी इंजिनिअर तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना पुण्यातील काळे पडलं परिसरात घडल्याचे समोर आले असून आरोपीनं पीडित तरुणीवर आधी कारमध्ये अत्याचार केला. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना फोन करून बोलावलं आणि तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केला. आरोपींनी आळीपाळीने पीडितेवर विकृतीचा कळस गाठला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून पीडित तरुणीचा प्रियकर आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या इतर तीन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बलात्कारासह अनैसर्गिक अत्याचाराची कलमं लावली आहेत. तमीम हरसल्ला खान असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी प्रियकराचं नाव आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही कर्नाटक राज्यातील असून ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करते. २०२१ मध्ये फेसबुकवर तिची ओळख आरोपी तमीमशी झाली होती. कालांतराने या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत पीडितेला जाळ्यात ओढलं. यातून पीडित तरुणी आरोपीला भेटण्यासाठी मुंबईतील कांदिवली परिसरात आली
दोघंही इथं एका हॉटेलमध्ये राहिले. यावेळी आरोपीनं पीडितेच्या शीतपेयात गुंगीच्या गोळ्या टाकल्या. तरुणीला गुंगी चढल्यानंतर आरोपीनं तिच्याशी जबदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर तो कारने पीडितेला पुण्याला घेऊन गेला. इथंही त्यांनी पीडितेवर अत्याचार केला. तमीमने कारमध्ये पीडितेवर अत्याचार केल्यानंतर त्याने फोन करून त्याच्या इतर तीन मित्रांना देखील बोलावून घेतलं.
यानंतर चारही जणांनी आळीपाळीने तरुणीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पीडित तरुणीचे अश्लील फोटो काढले. हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेकडून तब्बल ३० लाख रुपये उकळले. तसेच त्यांनी पीडितेकडून दोन आयफोन देखील घेतले. मागील अनेक महिन्यांपासून हे ब्लॅकमेलिंक सुरू होतं. आरोपींच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत मुख्य आरोपी प्रियकर तमीम खान याच्यासह त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण मुंबईच्या कांदिवली परिसरात घडल्याने हे प्रकरण कांदिवली पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.