संभाजीनगर

अश्लील व्हिडिओ दाखवत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार.

छत्रपती संभाजीनगर:–

 छत्रपती संभाजीनगर शहराजवळील रांजणगाव शेनपुंजी येथील नर्सरी कॉलनीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे .खाजगी शिकवणी असलेल्या टॉपर क्लासच्या ४५ वर्षीय शिक्षकाने चौथीतल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना आज (दि.१५) रविवार रोजी सकाळी उघडकीस आली आहे . या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जिल्हा हादरला आहे .

            सुभाष जाधव (४५)  असे आरोपी शिक्षकाचे नाव असून दीड वर्षापासून रांजणगाव शेपू येथे नर्सरी कॉलनीमध्ये टॉपर क्लासेस नावाने आरोपीची शिकवणी आहे . तीन दिवसांपूर्वी विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवत नराधमाने चौथीतल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला . आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे .

नेमके घडले काय ?
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील रांजणगाव शेनपुंजी येथील नर्सरी कॉलनीमध्ये  ४५ वर्षीय शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे . सुभाष जाधव असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे . पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार दीड वर्षांपासून रांजणगाव शेपू येथे नर्सरी कॉलनी मध्ये टॉपर क्लासेस या नावाने आरोपीची शिकवणी आहे .एम ए इंग्रजी एम एड असलेल्या सुभाष जाधव कॅनराधमासह तीन शिक्षकांनी मिळून ही शिकवणी सुरू केली होती .तीन दिवसांपूर्वी चौथीत शिकणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थिनीला नराधमाने अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार केला .

हा सर्व प्रकार घरी सांगितलास तर .. 
नराधमाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्यानंतर हा प्रकार घरी सांगितलास तर आई-वडिलांचे तुकडे करेन अशी धमकी दिली .घाबरलेल्या मुलींना क्लासला जायचं बंद केलं .मुलगी क्लासला जात नसल्याने आई-वडिलांनी विचारपूस केली असता  मुलीने सर्व हकीकत आपल्या पालकांना सांगितली . आपल्या मुली सोबत झालेला प्रकार समजतात मुलीच्या नातेवाईकांनी नराधम शिक्षकाला चांगलाच चोप दिला आहे .याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केली असून नराधमावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893840
error: Content is protected !!