महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या.
संभाजीनगर प्रतिनिधी:-
वैजापुरातील एका आश्रमात महिला कीर्तनकार संगीता पवार महाराज यांची अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
ही घटना शुक्रवारी (दि. २७) रात्रीच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहेत. वैजापुरातील एका आश्रमात संगीता पवार महाराज यांच्यावर मारेकऱ्यांनी थेट आश्रमात घुसून दगडाने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून, ठोस पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हत्येचे कारण अजून अस्पष्ट.
हत्या नेमकी का झाली आणि कोणी केली? याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात नेमके काय खुलासे होणार? हे पाहणे महात्त्वाचे ठरणार आहे.