Sindhudurg

*मुंबई – गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव द्या” ;एस.एम.देशमुख यांची मागणी* 

सिंधुदुर्ग नगरी : मुंबई – गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव द्यावं अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे..

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या 179 व्या पुण्यतिथी निमित्त ओरस येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारकात आयोजित अभिवादन सभेत एस.एम.देशमुख बोलत होते..

अध्यक्षस्थानी पालकमंत्री नितेश राणे होते..

एस.एम. म्हणाले, मुंबई – गोवा महामार्ग व्हावा यासाठी पत्रकारांनी 2005 रोजी वडखळ येथे पहिले आंदोलन केले..त्यानंतर रस्त्यावर उतरून सतत त्याचा पाठपुरावा केला.. त्यामुळे 2012 मध्ये रस्त्याचे काम सुरू झाले मात्र विविध कारणांनी ते 12 वर्षे रखडले.. त्यानंतरही काम लवकर व्हावे यासाठी कोकणातील पत्रकार आंदोलन करीत राहिले.. केवळ पत्रकारांचा लढा आणि 17 वर्षे सलग पाठपुरावा केल्याने हे काम मार्गी लागत आहे.. पत्रकारांचा लढयामुळे हा मार्ग होत असलयाने महामार्गाला एका पत्रकाराचे नाव देणे औचित्यपूर्ण ठरेल..

बाळशास्त्री जांभेकर हे केवळ पत्रकार नव्हते, ते विचारवंत होते, शिक्षक होते, भाषा प्रभू होते, सामाजिक कार्यकर्ते होते, आणि ते कोकणातले होते.. त्यामुळे महामार्गाला त्यांचे नाव देऊन उचीत स्मारक करावे अशी मागणी देशमुख यांनी केली..

परदेशात साहित्यिक, विचारवंत, पत्रकारांचे पुतळे आहेत, त्यांची नावं रस्त्यांना आहेत.. आपल्याकडे फक्त नेत्यांची किंवा त्यांच्या आई वडिलांची नावं रस्त्यांना देण्याची पध्दत आहे.. या महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव देऊन सरकारनं एक नवा पायंडा पाडावा अशी सूचना एस.एम.देशमुख यांनी केली.. हिंदीचे आद्य पत्रकार बाबूराव पराडकर देखील कोकणातील पराड गावचे.. तेथे त्यांचेही स्मारक व्हावे अशी मागणीही देशमुख यांनी केली..

आपल्या भाषणात नितेश राणे यांनी देशमुख यांच्या मागण्यांच्या सोडवणुकीसाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले असले तरी महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव देण्याच्या मागणीवर त्यांनी सोयीस्कर मौन बाळगले..

अभिवादन सभेसाठी राज्यभरातून परिषदेचे 100 पदाधिकारी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!