Solapur

अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा कारमध्येच आढळला मृतदेह.

सोलापूर प्रतिनिधी:- – राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटाचा सरचिटणीस ओंकार हजारे यांचा मृतदेह रविवारी रात्री त्यांच्या घरासमोरील कारमध्ये पोलिसांना आढळला. ओंकार हजारेचे वय ३२ असून ते सोलापूरच्या पापय्या तालीम परिसरात राहायला होते. ओंकार हजारे यांच्या मृत्यूमुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

 

ओंकार हजारे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. रविवारी दुपारी ते कारमध्ये बसले. त्यानंतर ते बाहेरच आले नाहीत. घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी कारच्या दरवाजातून डोकावून पाहिले असता ते सीटवर निपचित पडले होते. कारचा दरवाजा तोडून बेशुद्धावस्थेत त्यांना बाहेर काढले. उपचारासाठी हॉस्पिटलला नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

ओंकार हजारे यांनी पक्षात संघटनात्मक कामावर भर देत तरुणांचे संघटन केले होते. स्थानिक परिसरात ओंकार यांना अण्णा नावाने ओळख होती. मात्र त्यांच्या अकाली निधनाने सोलापूरने उगवते राजकीय नेतृत्व गमावले आहे. २०१९ साली ओंकार हजारेंचे लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात कुटुंबात आई वडील, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. मागील काही महिन्यांपासून ओंकार कौटुंबिक कारणामुळे नैराश्येत असल्याचे बोलले जाते. रविवारी ८ तारखेला त्यांच्या मेव्हण्याच्या लग्नाची पत्रिकाही मिळाली नव्हती असं निकटवर्तियांनी सांगितले

नेमकं काय घडले?

८ जून रोजी सकाळपासून ओंकार हजारे कुणालाही न सांगता घराबाहेर पडले होते. खूप वेळ झाला तरी ते घरी न परतल्याने कुटुंबाला चिंता सतावू लागली. त्यानंतर घरच्यांनी, मित्रमंडळींनी त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला परंतु ते कुठेच सापडला नाही. अखेर घरासमोरील कारमध्ये ते सीटवर बसल्याचे दिसून आले. घरच्यांनी त्यांना आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ओंकार यांनी काहीच प्रतिसाद देत नव्हता. मग काच तोडून दरवाजा उघडण्यात आला त्यावेळी ओंकार हजारे बेशुद्धावस्थेत असल्याचे दिसून आले. परंतु हॉस्पिटलला नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. सध्या या घटनेची पोलीस चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893842
error: Content is protected !!