Telgav

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण जागीच ठार.

तेलगाव प्रतिनिधी :– भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका व्यक्तीस जोराची धडक दिल्राने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार 

झाल्याची घटना शुक्रवार (दि.१३) सायंकाळी घडली.घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अधिक माहिती अशी की,केज येथील शेख आसरफ बाबा मियाॅ रा.टिपु सुलतान चौक केज हे शुक्रवार (दि.१३) रोजी सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान भोगलवाडी फाटा येथील बस स्टॉपवर थांबले होते.यावेळी धारूरकडुन भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने शेख आसरफ यांना जोराची धडक दिली यात ते जागीच ठार झाले.धडक दिलेले वाहन काही क्षणातच घटनास्थळारून पसार झाले.या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव ढाकणे व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन,त्यांनी घटनास्थळाची व घटनेची पाहणी करून प्रेत शवविच्छेदनासाठी धारूर ग्रामीण रूग्णालरात पाठवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Our Reader

7893839
error: Content is protected !!