तुळजापूर

सेवानिवृत्ती मंजुरीसाठी दीड लाखाची लाच; लाचखोर संस्था सचिव लाचलुचपत पोलिसांच्या सापळ्यात.

तुळजापूर प्रतिनिधी:-

क्राईम वृत्त:

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला ज्ञानदानाच्या बुरख्याखाली शिक्षणाचा बाजार मांडलेल्या शिक्षण संस्थाच काळीमा फासत असल्याचे प्रकार उघड होत असतानाच संस्थाचालकाच्या जाचाला कंटाळलेल्या एका शिक्षकाने संबंधित शाळेकडे दिलेला स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या संस्था सचिवाला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रंगेहाथ पकडण्यात आले असून, लाचखोर संस्था सचिव धनाजीराव ज्ञानदेव पेठे पाटील याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला गजाआड करण्यात आले आहे. याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की,सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील नागनाथ गल्ली येथील रहिवासी असलेले धनाजीराव पेठे पाटील हे तुळजापूर येथील रावसाहेब जगताप कर्णबधीर विद्यालयाचे सचिव आहेत. तक्रारदार शिक्षक हे तुळजापूर येथील रावसाहेब जगताप कर्णबधीर विद्यालयात कला शिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी संस्था सचिवाच्या विविध जाचांना कंटाळून स्वेच्छा सेवानिवृत्ती मंजूर करण्यासाठी संस्थेकडे विनंती अर्ज सादर केला होता. संबंधित तक्रारदार असलेल्या कला शिक्षकाचा स्वेच्छा सेवानिवृत्ती अर्ज मंजूर करण्यासाठीचा ठराव घेण्याकरिता लाचखोर सचिव धनाजीराव पेठे पाटील याने तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष तब्बल १ लाख ५५ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराने शिक्षकाने धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली . स्वेच्छा सेवानिवृत्ती अर्ज मंजूर करण्यासाठी रावसाहेब जगताप कर्णबधीर विद्यालयाच्या सचिवाने दीड लाखांची रक्कम पंचासमक्ष स्वतः स्विकारली असता त्यास लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिक्षक तक्रारदाराने धाराशीव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे भ्रमणध्वनींवर संपर्क साधुन तक्रार दिली होती. त्यानुसार तुळजापूर येथील आरोपीच्या कार्यालयात पडताळणी केली असता आरोपीने पंचासमक्ष १ लाख ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडले. यावेळी आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ६ हजार १८० रुपयांची रोकड आणि अंदाजे १ तोळा वजनाची सोन्याची अंगठी मिळून आली. आरोपी सचिवाच्या घराचीही घरझडती घेण्यात आली आहे आहे. रात्री उशिरा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचखोर आरोपी पेठेपाटील याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातील मोबाईल जप्त करण्यात आला असून पुढील निरीक्षण करुन तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!