सांगली

सांगली जिल्हा परिट समाज यांच्या वतीने खासदार विशाल पाटील यांना निवेदन 

शिराळा / प्रतिनिधी

राज्यातील परीट (धोबी) समाजाला एस. सी. आरक्षण मिळावे म्हणून संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासंदर्भात व परीट समाजातील विविध मागण्यांचे निवेदन आज सांगली येथे खासदार विशाल दादा पाटील यांना सांगली जिल्हा परिट समाज यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय साळुंखे व महिला अध्यक्षा सौ. शर्मिलाताई शिंदे, यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी परीट समाज पश्चिम विभागीय अध्यक्ष अनिल साळुंखे, राज्य कार्यकारणी सदस्य विनायकराव यादव, लॉन्ड्री जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे, माजी जिल्हा अध्यक्ष अशोक शिंदे, जिल्हा सचिव विजयराव खेडकर, जिल्हा युवा अध्यक्ष रोहन परीट, सांगली शहराध्यक्ष तुषार शिंदे, खजिनदार सुनील ठोंबरे, महादेवराव माने उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील परीट (धोबी) समाजाचा एस. सी. आरक्षणाचा प्रश्न हा सन 1950 सालापासुन प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या डॉ. भांडे समिती सन 2002 मध्ये एस. सी. यादीत एकमुखी शिफारस केलेली आहे. सध्या हा प्रश्न सामाजिक न्याय विभाग नवी दिल्ली मार्फत आर जी आय च्या कार्यालयात प्रलंबित असुन त्यांची भूमिका ही कार्यकक्षेत नेहमी नकारात्मक असते. त्याबद्दल आपण संसदेत प्रश्न उपस्थित करावा. तसेच परीट समाज सांगली जिल्ह्यामध्ये पस्तीस ते चाळीस हजार लोकसंख्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वास्तव्यास असून विविध कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आल्यानंतर बसणे व राहणेसाठी सभागृहाची गरज आहे. अनेक गावातून व खेड्यातून शैक्षणिक शिक्षण घेणेसाठी समाजीतील मुलांना वस्तीगृह व आभ्यासिका यांची ही गरज आहे. तसेच समाजीतील मुलांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून देणे संदर्भात शासकीय मदत मिळावी असे म्हटले आहे.

 

यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले, लवकरच याविषयी समितीच्या माध्यमातून अभ्यास करून राज्यातील परीट (धोबी) समाज बांधवांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम मी नक्की संसदेत प्रश्न मांडून असे आश्वासन दिले.

 

यावेळी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष महेश निकम, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख रवि यादव शिराळा, महिला प्रदेश उपाध्यक्ष क सौ. सुमनताई परीट (इस्लामपूर), सांगली जिल्हा महिता कार्याध्यक्षा सौ. संगीताताई राऊत निवेदनात सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!