अंबाजोगाई

निवडणुकीच्या रिंगणात अंबाजोगाईचे युवा नेतृत्व संकेत राजकिशोर मोदी यांनी पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई शहर काढले पिंजून

अंबाजोगाई(प्रतिनिधी):- अंबाजोगाई शहर हे राजकिशोर मोदी व मोदी कुटुंबाला मानणारे शहर आहे. त्यांच्या आशिर्वादानेच राजकिशोर मोदी हे मागील अनेक वर्षांपासून अंबाजोगाई नगर परिषदेच्या माध्यमातून शहरवासीयांची सेवा करत आहेत.आपल्या पित्याचा समाजसेवेचा वसा राजकिशोर मोदी यांचे सुपुत्र संकेत राजकिशोर मोदी हे पुढे चालवताना आढळून येत आहेत. ते सामाजिक शैक्षणिक तसेच सांस्कृतिक घडामोडीत हिरीरीने सहभाग घेऊन शहराची संस्कृती पुढे नेत आहेत. सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकिय क्षेत्रात देखील ते हळूहळू सक्रिय होऊ पहात आहेत.

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात येत आहे. अंबाजोगाई केज विधानसभा मतदार संघात देखील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा प्रचार देखील जोर धरू लागला आहे. साठे यांच्या प्रचारासाठी संकेत राजकिशोर मोदी यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह संपूर्ण अंबाजोगाई शहर हे अक्षरशः पिंजून काढले आहे.अंबाजोगाई शहरातील प्रभाग क्रमांक १ पासून ते प्रभाग क्रमांक १४ मधील सर्व भागात जाऊन तेथील प्रत्येक नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्याचा प्रयत्न केला व त्यामध्ये त्यांना मोठया प्रमाणावर यश देखील प्राप्त झाले.

प्रत्येक भागातील नागरिकांनी संकेत राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकार्यांचे स्वागत मोठ्या उत्स्फूर्तपणे केले. यापुढेही आपण मोदी कुटुंबावर असेच प्रेम व सहकार्य करत राहू असा शब्द देखील अंबाजोगाई शहरवासीयांच्या वतीने संकेत मोदी यांना दिला जात होता. भेटी दिलेल्या भागामध्ये संकेत मोदी यांच्या बरोबर प्रथमेश पृथ्वीराज साठे , गणेश मसने,सुधाकर टेकाळे, सचिन जाधव, अनुप जाजू,खलील जाफरी, अंकुश हेडे, दत्ता सरवदे, शाकेर काझी,प्रणव लोढा, गौरव उपाध्याय, कन्हैय्या सारडा, अमजद पठाण, अस्लम शेख , जावेद गवळी, रफिक गवळी, आकाश कऱ्हाड, अजीम जरगर, रोहित देवकर, साईराज देवकर, राजेश चव्हाण, प्रसाद कोंबडे,  साईराज धोत्रे यांच्यासह अनेक सहकारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!