अंबाजोगाई (प्रतिनिधी) :
तालुक्यातील धावडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाटिका, देशभक्तीपर गीते व भारुड पारंपरिक कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भारत विनायकराव नेहरकर हे होते. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक कार्यक्रमांमुळे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते, असे यावेळी शिक्षकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, श्री बालासाहेब बसलिंग पिसुरी सर श्री गायकवाड सर श्री नखाते सर सौ निर्मले मॅडम सौ धीवार मॅडम सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
