पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन
अंबाजोगाई प्रतिनिधी :
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस निरीक्षक मा. शरद जोगदंड व त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलीस अधीक्षक मा. नवनीत कावत यांनी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व त्यांच्या संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक करून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले.
घरफोडीच्या या गंभीर गुन्ह्याचा तपास पूर्ण करत आरोपींना ताब्यात घेण्यासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे तपासाला यश मिळाले. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पथकाने केलेली मेहनत, तपासातील तत्परता आणि समन्वय यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले.
पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केलेल्या या गौरवामुळे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड आणि त्यांच्या पथकाच्या कामगिरीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या यशाबद्दल पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व त्यांच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, पुढील काळातही अशीच उत्कृष्ट कामगिरी घडावी, यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
