अंबाजोगाई प्रतिनिधी : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या आरसीसी शिकवणी वर्गाचे प्रमूख शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. रविवारी दुपारी २ वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू होती. दोन दिवसापूर्वी त्यांच्या शिकवणी वर्गाच्या कार्यालयातून अनेक प्रकारचे कागदपत्रे ‘सीबीआय’ ने जप्त केले होते. मात्र, त्यांना ताब्यात घेतले नव्हते. रविवारी रात्रीही त्यांची चौकशी सुरू होती.
नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचे समजल्यानंतर या शिकवणीवर्गातून ४२ प्रश्ने ‘ नीट ’ परीक्षेत आल्याची तक्रार एका पालकाने केली होती. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असतानाच ‘सीबीआयचे’ पथक लातूरमध्ये दाखल झाले. त्यांनी मोटेगावकर यांची चौकशी सुरू केली. मात्र, कोणत्या शिकवणी चालकाच्या विरोधात कारवाई करण्यात आली हे जाहीर केले नव्हते.
सीबीआयने शिकवणी वर्ग चालकाची चौकशी सुरू केल्याचे शनिवारी स्पष्ट झाले होते. मात्र, त्या दिवशी आपण अगदी विद्यार्थ्यांना शिकवल्याचा दावा मोटेगावकर करत होते. सोमवारी सकाळी मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पेपरफुटी प्रकरणात अटकेत असणारा लातूरचा प्रा. पी. व्ही कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि मोटेगावकर हेही रसायनशास्त्र शिकवत. आरोपीबरोबर मोटेगावकरांचे संबंध कसे याचा शोध सीबआयचे अधिकारी घेत होते.लातूरमध्ये वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यज्ञंचे बॅन्ड लावून कौतुक करण्यापासून ते लातूर पॅटर्नचे फॅक्टरीमध्ये रुपांतर करण्याची जाहिरात मोटेगावकर करत. त्यांना ताब्यात घेतल्याने लातूर पॅटर्नच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागणार आहेत. लातूरमध्ये किमान ३० – ३२ शिवकवणीवर्ग सुरू असून त्याचे लाखो रुपयांचे शुल्क असते. या शिकवणीवर्गात आता उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शिक्षक अध्यापाने काम करत आहेत
