अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाई शहर पोलिसांनी शनिवारी (दि. 25 जुलै) सायंकाळी शेवगावडी शिवारातील अजय हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर धाड टाकून चार जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, चारचाकीऐवजी दोन मोटारसायकली, तीन मोबाईल फोन, जुगाराचे साहित्य व रोकड असा एकूण ₹2,08,800 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रेम शिवाजी जाधव (वय 25), अतिक फारूक शेख (वय 24), मयूर मधुकर भिसे (वय 24) आणि मयूर लहू गोर्रे (वय 22, सर्व रा. पिंपळा धायगुडा, ता. अंबाजोगाई) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, 1887 च्या कलम 12(अ) अन्वये गुन्हा क्रमांक 305/2026 दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान आरोपींकडून रोख जुगाराची रक्कम, मोबाईल फोन, दोन मोटारसायकली आणि जुगार खेळण्यासाठी वापरलेले 40 पत्ते जप्त करण्यात आले.
ही कारवाई अंबाजोगाई शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
