बीड प्रतिनिधी :-सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाच्या न्याय मागण्यांसाठी आज राज्यव्यापी दोन तास काम बंद आंदोलन करण्यात आले.यामध्ये बीड जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी देखील या आंदोलनात सहभाग नोंदवला.
सुधारित सेवा प्रवेश नियम तात्काळ अंतीम करावेत, सुधारित आकृतीबंधास त्वरीत शासन मान्यता द्यावी, सर्व प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया तातडीने पुर्ण करावी, रिक्त पदांवरील सर्व सेवा भरती त्वरीत सुरू करावी आणि परिचारिका संवर्गाच्या सर्व प्रलंबित सेवा विषयक प्रश्नांवर कालबध्द निर्णय घ्यावा आदि मागण्यांसाठी महाराष्ट्र गर्व्हमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने आज राज्यव्यापी काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. बीड जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवत काम बंद आंदोलन केले.
