अंबाजोगाई प्रतिनिधी : अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून, संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी शोधपत्रिका प्रसिद्ध केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजता एसआरटीआर रुग्णालयाच्या परिसरात, अंबाजोगाई येथे अंदाजे ६० वर्षीय अनोळखी पुरुष आढळून आला. त्यानंतर १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.२३ वाजता याबाबत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४२/२०२६ नोंद करण्यात आला आहे.
सदर पुरुषाची उंची अंदाजे ५ फूट ६ इंच, शरीरयष्टी सडपातळ, रंग सावळा, चेहरा उभट, नाक मोठे व सरळ असून केस काळे-पांढरे आहेत. दाढी-मिशा वाढलेल्या असून त्या काळ्या-पांढऱ्या रंगाच्या आहेत. मृत व्यक्तीच्या अंगावर पिवळ्या रंगाचे टी-शर्ट व विटकरी रंगाची अंडरवेअर असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास अथवा फोटोतील व्यक्तीची ओळख पटत असल्यास अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे किंवा संबंधित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क :
पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर – 02446-247100
प्रभारी अधिकारी – 9765529777
चौकी अंमलदार – 9823144787
