अंबाजोगाई प्रतिनिधी :-
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अनिल मस्के यांना चेस्ट कौन्सिल ऑफ इंडियातर्फे एफसीसीआय (FCCI) प्रतिष्ठित फेलोशिप प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. वैद्यकीय तसेच श्वसनविकार उपचार क्षेत्रातील त्यांचे सखोल ज्ञान, रुग्णसेवेतील योगदान आणि वैद्यकीय क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना हा बहुमान देण्यात आला.
चेस्ट कौन्सिल ऑफ इंडियाकडून मिळालेली ही फेलोशिप त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याची राष्ट्रीय पातळीवर झालेली उल्लेखनीय दखल मानली जात आहे. विशेषतः श्वसनविकार आणि रुग्णसेवेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानामुळे अंबाजोगाईच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
अनिल मस्के यांच्या या यशामुळे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या लौकिकातही भर पडली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी तसेच अंबाजोगाईतील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
