शासकीय धान्याचा काळाबाजार उघड; 194.96 क्विंटल तांदूळ ट्रकसह पोलिसांच्या ताब्यात! असा एकूण अंदाजे 27,00,000/-रुपये मुददेमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कारवाई
यवतमाळ प्रतिनिधी :–
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच उघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत
दिनांक 24/10/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद कडील पथक उपविभाग उमरखेड पोलीस स्टेशन महागांव हददीत अवैध धंदे, अउघड गुन्हे, आरोपी शोध कामी नागपूर ते तुळजापूर रोडने पेट्रोलींग करीता असतांना ट्रक क्रमांक MH-26-BE-1821 यामध्ये तांदुळ असून तो काळया बाजारात विक्री करीता घेवून जात असल्याचे माहीती मिळाल्याने सदरचा ट्रक थांबवून त्यामध्ये काय आहे याची पाहणी केली असता त्यामध्ये तांदळाचे कटटे मिळून आल्याने चालक नामे अंबादास नंदु व्यवहारे यास सदर ट्रक मधील तांदळाच्या खरेदीची पावती, बिल्टी किंवा वैध परवाना कागदपत्राची मागणी केली असता कोणत्याही प्रकारचे कागदपत्र सादर न केल्याने सदर वाहनातील तांदुळ शासकीय सार्वजनिक वितरण प्रणालीतील असल्याचा वाजवी संशय आल्याने ते ताब्यात घेवून मा. तहसिलदार सा तहसिल कार्यालय महागांव यांना सदरचा तांदुळ सार्वजनिक वितरण प्रणालीत आहे किंवा कसे याबाबत स्पष्ट अहवाल मिळणे करीता पत्रव्यवहार केला असता दिनांक 02/11/2026 रोजी पुरवठा अधिकारी तहसिल कार्यालय महागांव यांनी ट्रक क्रमांक ट्रक क्रमांक MH-26-BE-1821 मधील एकूण 194.96 क्विटल तांदुळ हा शासकीय सार्वजनिक वितरण प्रणालीतील असतांना देखील तो काळया बाजारात विक्री करीता नेत असल्याने चालक अंबादास नंदु व्यवहार, शेख शौकत शेख महताब, वाजिद रा. देंगलूर यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन महागांव येथे कलम 3, 7, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मा.पोलीस निरीक्षक श्री. सेवानंद वानखडे पो स्टे महागांव यांचे मार्गदर्शनात धिरज बांडे,अमोल राठोड, पुरवठा अधिकारी श्री मोहन कोल्हे, मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखांब,सुभाष जाधव, रमेश राठोड, सुनिल पंडागळे, रविंद्र शिरामे,राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
