आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात अंबाजोगाईत भव्य महामोर्चा!
अंबाजोगाई प्रतिनिधी
सहा डिसेंबर पर्यंत आरक्षण उपवर्गीकरण वापीस घेतले नाहीतर याद राखा असे खडेबोल मा.आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, अंबाजोगाई जि. बीड यांच्या वतीने अंबाजोगाई शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या महामोर्चात

सर्व समाजाचे हजारो लहानमुले-वृद्ध,महिला- पुरुष सामील होते. सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोर्चात विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनुसूचित जाती समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पुढे बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की,भिमा कोरेगावचा ईतिहास विसरू नका. आंबेडकर वाद्यांच्या नादी लागु नका.एक लढाई जंतरमंतरवर झाली प्रधान गेला. आम्ही उतरलो तर देवेंद्र-नरेंद्र जातील.
आरक्षण उपवर्गीकरण करून आंबेडकर वाद्दायांचे खचीकरण करायचे प्रयत्न हानून पाडूयात.
रस्त्यावरची ताकदीला सरकार घाबरले आहेत. सहा डिसेंबर पर्यंत उपवर्गीकरण वापीस घेतले नाही. तर मग दाखवून देवू कोण किती पाण्यात आहे. या देशातील जनता सार्वभौम आहे.आंदोलन चालूच राहील, पुढील लढाई साठी आपण सर्वांनी तयार रहावे असे आव्हान केले.
यावेळी अँड.सुरेश माने,काँ.बब्रुवाहन पोटभरे,रुक्मिणीताई लोंढे,नरसिंगे सर,रोहीदास बन्सोडे,यांच्यासह इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य शासनाकडून सुरू असलेल्या पुढील प्रक्रियेला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावे, अशी प्रमुख मागणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून, त्यामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच उपवर्गीकरणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याचा मुद्दाही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. संबंधित अहवाल तातडीने जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
समितीच्या प्रमुख मागण्या
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी.
उपवर्गीकरणाबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल तातडीने सार्वजनिक करावा.
अनुसूचित जातीतील २ लाख ५० हजार मागासवर्गीय सरकारी नोकऱ्यांच्या अनुशेषाची भरती तातडीने करण्यात यावी.
अनुसूचित जातीतील लोकसंख्येच्या वाढीचा विचार करून आरक्षणाचे प्रमाण योग्य पद्धतीने निश्चित करावे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करावी.
अनुसूचित जाती समाजाच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक भूमिका घ्यावी.
निवेदनावर संयोजक समितीचे पदाधिकाऱी
संयोजक समितीचे अध्यक्ष भिमराव सरवदे, स्वागताध्यक्ष काँ.बब्रुवाहन पोटभरे, सदस्य अॅड. माणिक आदमाने, सुधाकर हातागळे,श्रीधर सिरसट, दशरथ सोनवणे, आरुण बनसोडे, संजय वाघमारे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
समितीने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे विभाजन करण्याऐवजी सामाजिक न्यायाच्या मूलभूत उद्देशाचा विचार करण्याची मागणी केली आहे. आरक्षणाचा लाभ संबंधित समाजातील गरजू घटकांना मिळावा, मात्र त्यासाठी आरक्षणाचे अंतर्गत विभाजन करण्याऐवजी प्रलंबित अनुशेष भरती, शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ यांसारख्या उपाययोजना करण्यावर शासनाने भर द्यावा, अशी भूमिका समितीने मांडली आहे.
“आरक्षणाचे विभाजन नको, सामाजिक न्याय हवा” या भूमिकेतून आजचा मोर्चा आयोजित करण्यात आला असून, अंबाजोगाई शहरात या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.
शांततेच्या मार्गाने मोठ्या संख्येने नागरिकांनी मोर्चात सहभागी होऊन आपल्या मागण्यांसाठी आवाज बुलंद करावा, असे आवाहन आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी विविध संघटनांनी अल्पोपहार, फळाहार,पाणी बाँटल,जार,शरबतची व्यवस्था करण्यात आली होती.
महामोर्चा यशस्वी करण्यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
